रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी रो.पवन जोशी यांची तर रो.महेश पवार यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.कोरोना महामारीच्या या काळात ही बैठक ऑनलाइन संपन्न झाली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल डॉ.अनिल परमार तर सन्माननिय पाहुण्या विधान परिषद उपसभापती. ना.डॉ.नीलम गोरे होत्या.कार्यक्रमात सहभागी मान्यवर- सहाय्यक प्रांतपाल मुकेश गुप्ता,सहाय्यक प्रांतपाल रो.धनश्री जोग,उपाध्यक्ष रामदास जैद,संस्थापक अध्यक्ष सुप्रिया बडवे,मावळते अध्यक्ष गंगाधर जपे,मेंबरशिप डायरेक्टर प्रकाश सुतार,तसेच रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडने विविध उपक्रम करण्याचे योजिले आहे त्या गुंडाळवाडी व बुरसेवाडी गावातील अरुण गुंडाळ,सतीश जैद,सागर भोर,बाबुराव भोर,महेश राखुंडे,चंद्र्कांत भोर,संगीताताई तनपुरे व अन्य मान्यवर रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष रो.पवन जोशी यांनी आगामी काळात पर्यावरण,महिला सबलीकारण,शिक्षण,आरोग्य इत्यादी क्षेत्रांत विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.डॉ.नीलम गो-हे यांनी सामाजिक कार्य फक्त सरकारच करू शकत नाही तर स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग घेतला पाहिजे असे नमूद केले.
छायाचित्र : पवन जोशी