स्वरूप संप्रदाय सर्व शिष्य मंडळींतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव या वर्षी ऑनलाइन फेसबुक ,यू ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे यांनी संगितले की कर्म,भक्ति,ज्ञान,दान यांचीच पुजा करावी.भारतीय संस्कृतीत दान धर्माचे अपार महत्व केलेले आहे.गुरूविना आत्मा परमात्म्याचे ज्ञान होत नाही.आध्यात्मिक ज्ञान गुरु परंपरेनुसारच मिळते.गुरुपौर्णिमा अर्थात पाप ,ताप,अज्ञान,अंधकार,दूर करणारी मोठी पौर्णिमा आहे.ज्याच्या मुखात गुरुमंत्र आहे त्याची सर्व कार्य सिद्ध होतात,आपल्या गुरूंना अभिप्रेत असलेले कार्य करावे हीच खरी गुरूदक्षिणा आहे.मनुष्य जन्म मिळणे म्हणजे अमृताच्या सागरात पोहण्याची संधी मिळणे होय.शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो परंतु अध्यात्माने हृदयाचा विकास होते.हृदयाच्या विकासामुळे मनुष्यात नितीमूल्य व सदगुणांचा विकास होतो.म्हणून विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या.प्रयत्नाने प्रारब्धावर मात करता येथे.सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा.प्रपंचातील कर्तव्ये विसरू नका.पण तो करीत असताना भगवंताचे स्मरण टाकू नका.सुखाने व आनंदित रहा हाच आमचा आशीर्वाद – डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे
छायाचित्र :ऑनलाइन प्रवचन करताना डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे