हडपसर मधील मेगा सेंटर या व्यावसायिक इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे.व्यवसायिकांनी महापालिका,मेगा सेंटर व्यवस्थापनास वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नाही. मागील महिन्यात नोंदणी कार्यालयात आलेल्या दोन वयोवृद्ध व्यक्तींना या कुत्र्यांनी चावा घेतला असून मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन कार्यवाही करणार का असा सवाल या इमारतीतील व्यावसायिक विचारत आहेत.या बाबतीत दीपक कुदळे,सुनील गायकवाड,सुनील हरपाळे,महेंद्र लुणीया,भगवान तुपे,निलेश मगर यांनी वेळोवेळी कारवाईची मागणी केली आहे.महापालिकेत तक्रार दाखल केल्यावर तेथे नसबंदी केलेली कुत्री आढळल्याचे सांगून तक्रार बंद केली जाते.टीआर काही कार्यकर्त्यांकडून कुत्र्यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली जाते,यामुळे या इमारतीतील बहुतेक व्यावसायिक गाळे बंद अवस्थेत आहेत.
छायाचित्र : मेगासेंटर मध्ये हिंडणारी मोकाट कुत्री.