मराठी भाषा दिनानिमित्त शिरवाडकरांच्या संगीत “ययाती –देवयानी”चे इंग्रजी भाषांतराचे प्रकाशन

Share This News

आज मराठी भाषा दिना निमित्त कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकरांच्या संगीत ययाती-देवयानी नाटकाचे इंग्रजी भाषांतर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या प्रकाशन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ,उल्हासदादा पवार,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर,इंग्रजी अनुवाद करणारे अनुवाद्क व प्रकाशक निनाद जाधव,निनाद जाधव हे जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचे नातू होत.ते संगीत नाटकांत भूमिका करतात व तांत्रिक क्षेत्रात काम करतात.नाट्य क्षेत्रातील संजय देशपांडे,रविंद्र कुलकर्णी,नलिनी गोखले,प्रभाकर भावे,राजीव परांजपे,भाग्यश्री देसाई,अस्मिता चिंचाळकर,भक्ति पागे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना उल्हासदादा पवार यांनी भाषांतर म्हणजे फक्त कपडे बदलणे नव्हे तर एका आत्म्याने दुसर्‍या आत्म्यात जाणे असते असे सांगितले.सतीश आळेकर यांनी बोलतांना भाषांतर हे दोन भाषा-प्रदेशांना जोडणारी पायवाट असते असे संगितले.पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरकार निनाद जाधव यांनी बोलतांना “मराठी संगीत-नाटक अमराठी लोकांपर्यंत पोचावे,त्यांना आपल्या समृद्ध नाट्यकलेचा आस्वाद घेता यावा यासाठी गद्य व पद्य अशा दोघांचे ही भाषांतर केले आहे.ते करताना शिरवाडकरांच्या भाषेचे व काव्याचे सौंदर्य ही जपले आहे.आगामी काळात या इंग्रजी भाषांतर नाटकाचे प्रयोग करण्याचा मानस असल्याचे सांगितले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोना संबंधी सर्व नियमांचे पालन करीत हा समारंभ संपन्न झाला.पुस्तकाची पाने ११६ असून मूल्य १५० रु आहे.  

छायाचित्र :डावीकडून उल्हासदादा पवार, सतीश आळेकर,निनाद जाधव