दीपावली निमित्त महिलांना विविध पदार्थ महाराष्ट्राचे लाडके मराठमोळे शेफ विष्णु मनोहर यांच्या कडून शिकता यावेत यासाठी परिक्षित थोरात यांनी तीन दिवसीय कुकरी शो व कुकिंग स्पर्धेचे आयोजन केले. २९-३०-३१ ऑक्टोबर होणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटन यश रिजन्सी,केटरिंग अँड हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी आयोजक परिक्षित थोरात,शेफ विष्णु मनोहर,सचिन दांगट पाटील,प्रशांत शेट्टी,आदि मान्यवरांच्या बरोबरच महिलावर्ग उपस्थित होता.या वेळी परीक्षित थोरात यांनी कोरोना काळात बंदिस्त झालेल्या महिला वर्गास विविध पदार्थ तज्ञ व्यक्तींकडून प्रात्यक्षिकांसाह शिकता यावेत या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.यात ११ ते दुपारी २ व दुपारी ३ ते ६ अशा दोन बॅच होतील.यात सहभागी होणार्यांना पाककृती पुस्तक,५ वह्या व दिवाळी साहित्य भेट मिळेल असे संगितले. विष्णु मनोहर यांनी बोलताना महिलांनी नवे पदार्थ बनवताना चिंता करू नये. कारण सरावाने सर्व काही शिकता येते असे संगितले.कोव्हिड संबंधी सर्व नियमांचे कार्यक्रमात पालन करण्यात आले.
छायाचित्र :विष्णु मनोहर पाककृती करून दाखवताना.