भोईराज मित्र मंडळ, गणेश मित्रमंडळ, वंदेमातरम मंडळ, शिवतेज ग्रुप, नटराज मित्र मंडळ अशा पुण्यातील कसबा पेठेत असणार्या सुप्रसिद्ध अशा गोविंदा पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी विर मित्रमंडळाच्या पुढाकाराने संपन्न झाली. यात ५ थर लावण्यात आले. भोई आळी येथे संपन्न झालेल्या या मैत्रीपूर्ण दहिहांडी प्रसंगी विर मित्र मंडळ अध्यक्ष राजेंद्र सोनार, राहुल जाधव, गजानन महाडीक, तनिष्क ससाणे, विकी दरवडे, आदेश तारू, आलोक परदेशी व गोविंदा पथकातील गोविंदा उपस्थित होते. दहिहांडी उत्सवात सर्वच जण उत्साहाने सहभाग घेतात, काही वेळा स्पर्धा अथवा मतभेद वाद होवू शकतात मात्र हे सर्वजण एकमेकांचे मित्र असतात, यामुळे सर्वांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहवेत या हेतूने या संयुक्त मैत्री दहीहांडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. असे पत्रकात नमूद करण्यात आले. याचे वैशिष्ठ्य म्हणजे फ्लेक्स नाही व बक्षीस ही नव्हते.