तरूण अशोक मंडळ तर्फे यावर्षी देखील दही हंडी फोडणाऱ्या गोविंदासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच ट्रॉफी बक्षीस म्हणून देऊ केली आहे.मंडळातर्फे दरवर्षी ऊंच ट्रॉफी देण्याची परंपरा आहे.यावर्षी ही ट्रॉफी साडेसहा फूट उंच आहे.आकर्षक डिझाईनची ही ट्रॉफी दरवर्षी गोविंदा पथके आणि प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. मंडळाचा दही हंडी उत्सव बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर चौकात गुरुवारी ७ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळात होणार आहे.ही दही हंडी ३ते ४ थरांची अशी मर्यादित उंचीची असते.ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला यावर्षी ही सर्वात उंच (६.५ फूट)ट्रॉफी बक्षीस दिली जाणार आहे.अशी माहिती तरुण अशोक मंडळाचे विश्वस्त व्यंकटेश रापर्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय तावरे,मा.मनीष दिलीप भागणे,कार्याध्यक्ष पुष्कर तावरे,उपाध्यक्ष ओम महेश कोळेकर,उपस्थित होते.विशेष उपस्थिती श्री ललितशेठ जैन.स्पर्धेसाठी धोकादायक उंची ,तंबाखूची जाहिरात आणि व्यापारीकरण टाळून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.कार्यकर्ते सागर कुंभारकर जिग्नेश उपाध्ये,रोहित छालाणी,संकेत भोसले अथर्व पवार, व इतर उपस्थित होते.