राजस्थान मधील उदयपूर येथे राष्ट्रीय पॅरा-ऑलिम्पिक जलतरण समितीच्या वतीने नारायण सेवा संस्थान येथे *२१ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण अजिंक्यपद स्पर्धा* २४ ते २७ मार्च २२ ह्या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या. देशभरातून २३ राज्यातील ४०० पेक्षा जास्त पॅरा-जलतरण स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला.त्यात १४ श्रेणीतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पद्मभुषण देवेंद्र झांजरिया,मेजर ध्यानचंद खेलचंद्र, कृष्णा नागर, ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
महाराष्ट्रच्या संघाने ३८६ अंक मिळवून विजेतेपद मिळविले व महाराष्ट्रातील खेळाडूंने घवघवीत यश संपादित केले.
पुण्याचा देवांशू उल्हास रेवतकर हा एस १४ श्रेणीतील *ऑटिस्टिक जलतरण खेळाडू* असून हा ह्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत *सर्व तृतीय आला व त्याने कांस्य पदक* पटकाविले. २०० मीटर फ्री स्टाईल अंतर केवळ ८ मिनिटे व ५६ सेकंद मध्ये पूर्ण केले.२०१५ पासून देवांशूला जलतरण थेरपी ला सुरवात केली.त्याला पाण्यात आनंद मिळतो व त्याचे मन रमते.
देवांशूला जलतरण प्रशिक्षक सौरभ देशपांडे यांचे मार्गदर्शन असून डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलाव मध्ये नियमित सराव करीत असतो.तसेच बाल कल्याण संस्थेचे अभिजित तांबे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
देवांशूने अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मध्ये भाग घेतला व अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
.
देवांशू ने यापूर्वी गोंदिया येथे २०१९ मध्ये झालेल्या ५० मीटर स्टाईल राज्य जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक,लायन्स क्लब पुणे द्वारा आयोजित राज्य स्पर्धेत तिसरा,२०१८ साली बालेवाडी येथे रोटरी क्लब ऑफ चिंचवड राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा,२०१६ साली झालेल्या लायन्स क्लब स्पर्धेत दुसरा,पुणे जिल्हा पातळीवर स्पर्धेत प्रथम,२०२० साली राज्य पॅरा जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता.
देवांशूची आई-वंदना व वडील-उल्हास रेवतकर यांचे नेहमीच त्याला प्रोत्साहन असते.उल्हास रेवतकर इंडियन पोटॅश लि.कंपनीमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून काम करतात.
“देवांशूला मी गेल्या आठ वर्षांपासून जलतरण तलावावर प्रशिक्षण देत आलो आहे.डेक्कन जिमखाना येथील टिळक स्वीमिंग टॅन्क वर देवांशू ला आणले.विविध स्पर्धा खेळण्यासाठी मी त्याला प्रोत्साहन देत असतो त्या अनुषंगाने नियमित सराव देत आहे यामुळे त्याचे आरोग्य उत्तम राहते व जीवन आनंदी होते,आत्मविश्वास वाढतो.भविष्यात देवांशू आपल्या देशाचे नाव जलतरण स्पर्धेत जगभरात उज्ज्वल करेल असा मला आत्मविश्वास आहे”
…………….*सौरभ देशपांडे*
देवांशू चा
जलतरण प्रशिक्षक