हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न.

Share This News

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शहीद भगतसिंग चौक शाखा गुरुवार पेठ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या ऑनलाइन पहिली ते १०वी च्या सुमारे १२०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.प्रतिकात्मक स्वरुपात काही विद्यार्थ्यांनी स्वारगेट येथील बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे सहभाग केला. विषय होता “कोरोना महामारीच्या काळातील कोरोना योद्धे”.या कार्यक्रम प्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे,आयोजक संदीप गायकवाड,गटनेते पृथ्वीराज सुतार,चंदन साळुंखे,नगरसेवाक विशाल धनवडे,उपशहर प्रमुख उमेश गालिन्दे,शहर महिला संघटिका निर्मलाताई केंडे.लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन नलावडे,राजेश पाटणे,निलेश माने,तुषार शिंदे,प्राजक्ता माने,प्रख्यात चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी प्रमुख पाहुणे होते.ही स्पर्धा गेली २६ वर्ष सुरू आहे असे आयोजक संदीप गायकवाड यांनी नमूद केले.या कार्यक्रमात कोरोना साथी असलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात आले.   

छायाचित्र : विद्यार्थी मान्यवर व पालक यांचे समूहचित्र.