घनकचरा विभागाकडून मंजूर केलेली निविदा रद्द करणेबाबत शिवसेनेचे महानगर पालिकेत आंदोलन.

Share This News

पुणे महापालिकेच्या रामटेकडी आणि हांडेवाडी येथील प्रत्येकी 75 टन क्षमतेच्या दोन कचरा प्रक्रिया प्रकल्पांना स्थायी समितीने पंधरा वर्षासाठी मंजुरी दिल्यानंतर प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यासाठी महापालिका अधिनियमातील 72 ब या नियमानुसार सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता केवळ ठेकेदार आणि त्यांना मदत करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील दलालांचा फायदा होण्यासाठी 87 कोटी रुपयाची निविदा मंजूर करण्यात आली. यासाठी उपायुक्त संदिप कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी महापालिका अधिनियमातील 72 ब नियमानुसार सर्वसाधारण सभेची मान्यता लागते असे मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांचे म्हणणे आहे. परंतु अधिनियम 72 ब खेरीज हे प्रकल्प मंजूर केले आहेत. पण घनकचरा विभागाने सर्वसाधारण सभेची मान्यता असण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केल्यामुळे संशयाच्या दृष्टीने या विभागाकडे लक्ष वेधले गेले आहे. या निविदेचा मलिदा ठेकेदारांसोबतच सत्ताधारी पक्षातील दलाल व महापालिकेतील अधिकारी यांना मिळणार आहे. असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे.

एका ठराविक कंपनीलाच या प्रकल्पांचे काम मिळावे म्हणून राजकीय स्तरावर सत्ताधारी पक्षातील एका अध्यक्षाने यासाठी मन लावून प्रयत्न केले आहे. तसेच राजकीय वरदहस्तामुळे प्रशासकीय स्तरावर सुद्धा ठराविक कंपनीलाच म्हणजे आदर्श एन्व्हायरो प्रा लि कंपनीलाच काम देण्यासाठी प्रयत्न झाले आहेत नियमबाह्य पद्धतीने सदर कंपनीला काम देण्यासाठी घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम यांनी भूमिका बजावली असल्याकारणाने याची चौकशी होणे गरजेचे वाटते. आणि तोपर्यंत संदीप कदम यांना निलंबित करण्यात यावे. तसेच सदर निविदा रद्दबादल ठरवून सदर प्रकल्पाची फेरनिविदा काढण्यात यावी. जनतेच्या कररुपी पैशांचा अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने अपव्यय होत असताना आम्ही शांत बसणार नाही. या निविदा प्रकरणाची सर्वंकष चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमून करण्यात यावी. या निवेदेमधे झालेला भ्रष्टाचार लवकर उघड करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, दिलीपराव तांबोळी,बाळासाहेब मालुसरे, उमेश वाघ, उत्तम भुजबळ चंद्रशेखर जावळे, राजेश मोरे, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, शैलेश जगताप, विनायक नांगरे, अमर मारटकर, नागेश खडके, संतोष भुतकर, पंकज बरीदे, नंदू येवले, मुरलीधर मिलकर, सचिन घोलप, नितीन रावलेकर, अजिंक्य पांगारे व शिवसैनिक उपस्थित होते.घनकचरा विभाग उपायुक्त संदिप कदम पळून गेल्यामुळे शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले. एक तास वाट पाहून पण आले नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांना घेराव घातला. सोबत आणलेला कचरा त्यांच्या टेबलवर टाकून सदर टेंडर रद्द करण्याची मागणी केली असता आयुक्त साहेबांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.