स्व. दीपक मारटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर,९७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Share This News

स्व. दीपक मारटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवसेना गवळी आळी शाखा व होनाजी तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे गवळी आळी येथे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या कार्यक्रम प्रसंगी सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवसेना पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव अविनाश बलकवडे, निकिताताई मारटकर, शांतीलाल सूरतवाला, नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, हेमंत रासने, मनसेचे प्रल्हाद गवळी, अमर मारटकर, होणाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल आलमखाणे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. शिबिराचे तांत्रिक संचालन आचार्य आनंद ऋषी रक्तपेढीने केले. 

छायाचित्र : रक्तदान शिबीर प्रसंगी मान्यवर.