आयुक्त साहेब, मिळकती असणारे गरीब नाहीत असे तुम्हाला कोणी पढविले – नगरसेवक विशाल धनवडे

Share This News

मागील 6 महिन्यात पुणे शहरातील ज्या 4000 मध्यमवर्गीय नागरिकांनी शहरी गरीब योजनेचा लाभ घेतला त्यांना मिळकत कर भरल्याने या योजनेचा लाभ का घेण्यात आला अशा नोटीस बजावण्यात आल्या असून या विषयाचा शिवसेना निषेध करते व आयुक्तांना सवाल करते की मिळकत करावरून आपण कसे ठरवू शकतो की यांचे उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी आहे . आपली ही योजना फक्त 1 लाख पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला देणाऱ्या नागरिकांना या योजनेचा आपण लाभ देतो आपणास हरकत असेल तर जिल्हाधिकारी यांना या लोकांना 1 लाख पेक्षा कमी उत्पन्न का आहे व का दाखला दिला याचा खुलासा मागावा . याचा अर्थ असा होतो की शहरातील मध्यम वर्गीयांना या योजपासून वंचित ठेवण्या करिता व ही योजना गुंडाळण्याकरिता प्रशासन व सत्ताधारी ह्या नोटीसा पाठवत आहेत असा आमचा आरोप आहे . 8 दिवसात हा प्रकार थांबवावा अन्यथा शिवसेना मोठे आंदोलन उभारेल.आपला नम्र : विशाल धनवडे (शिवसेना नगरसेवक)