पुणे (दि.३१) शिवसेना ऊबाठा गटाचे पुणे शहर उपसंघटक नितीन पवार यांनी नुकताच मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत(बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ.नीलमताई गो-हे, संजय मोरे, प्रशांत पालांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नितीन पवार यांच्यासह उपविभाग प्रमुख मंदार धुमाळ, शिवसेना शाखाप्रमुख लखन तोंडे, युवासेना प्रभाग अधिकारी शुभम कांबळे, प्रभाग उपधिकारी अनंता काळे, शाखा अधिकारी सौरभ कुसाळकर, लखन शिगवण, सुनील पासलकर, भरत सूर्यवंशी, निलेश सोनटक्के, गणेश वांजळे, अंकुश पोळेकर, कपिल उभे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. या प्रसंगी नितीन पवार यांनी आगामी काळात शिवसेनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात व सर्व वर्गात करून त्यांना शिवसेने सोबत जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
छायाचित्र : मा.उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडून भगवा ध्वज स्वीकारतांना नितीन पवार.