शांतीदूत परिवाराच्या वतीने रक्तदान,अवयवदान जनजागृती शिबीर आणि मान्यवरांचा “सेवा रत्न” पुरस्कार देवून सत्कार.

Share This News

पुणे (दि.९) जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवार व युनिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान अवयवदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या १३ मान्यवरांचा “सेवा रत्न” पुरस्कार”देवून सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. युनिटी हॉस्पिटल औंध येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक डॉ.विठ्ठल जाधव(IPS निवृत्त). प्रमुख पाहुण्या प्रचीती पुंडे, व अरुंधती पवार, विद्याताई जाधव, डॉ.प्रीती काळे, डॉ.अमित काळे, सुरेश सपकाळ, महेश पाटील, मोनिका भोजकर, विजया नागटिळक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल डोळेपाटील यांनी केले.
छायाचित्र : पुरस्कारार्थी व मान्यवर.