पुणे (दि.५) सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे आयोजित केलेल्या “उद्योग दिंडी २०२५” या खास उद्योजकांचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. यावेळी ५०० पेक्षा जास्त मराठी उद्योजकांनी या मेळाव्याचा फायदा उद्योग वाढीसाठी करून घेतला. हॉटेल मेरीगोल्ड बावधन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत, यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तरुणांनी उद्योगात यावे यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले. तर चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठी माणसाची मानसिकता ही उद्योगासाठी अनुकूल असतांना दिसत नाही, परंतु मराठी माणसाने ठरवले तर तो उद्योगात मोठी भरारी मारू शकतो असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, रवींद्र प्रभुदेसाई, पाटील काकी, शंतनू देशपांडे, सचिन मालपाणी, चेतन रायकर, अजय पुरोहित या मान्यवर उद्योजकांनी मार्गदर्शन केले.यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या काही व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन मा. अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल मा.सुहास फडणीस, विभावरी ब्राह्मणकर, रोहित केसकर यांनी केले.
छायाचित्र : चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करतांना अशोक दुगाडे, रोहित फडणीस व अन्य मान्यवर.