“इंग्लंड मधील उद्योग संधी” विषयावर भारत व इंग्लंड येथील उद्योजकांची झुम मीटिंग संपन्न.

Share This News

 

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने नुकतीच “युनायटेड किंगडम(इंग्लंड) मधील उद्योग संधी” या विषयावर भारत व इंग्लंड यामधील उद्योजकांची झुम मीटिंग संपन्न झाली. इंग्लंड मधील राजमाने लिमिटेडचे अमोल राजमाने प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी ब्रेक्झिट नंतर भारत व इंग्लंड या दोन देशांत होणार्‍या व्यवसायातील माहिती दिली. जलज मोहन पिंगळे(रिजनल को ऑर्डिंनेटर इंटरनॅशनल बिझनेस सेल)यांनी पुण्यातील उद्योजक कशा प्रकारे या संधी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करतील ते संगितले, मिलिंद पाटील(इंटरनॅशनल सेल प्रमुख) यांनी ट्रस्टच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन पुणे रिजनचे प्रमुख सुहास फडणीस यांनी केले. या मीटिंग मध्ये आपल्या उद्योगात इंटर नॅशनल बिझनेस सेलच्या मदतीने यश मिळवणार्‍या उद्योजकांनी आपले अनुभव संगितले यात अमोल कुलकर्णी, कल्याणी पाटील, ज्योतिराम जगताप, वाहीद ईनामदार, श्रीनिवास जोगीपेठकर यांचा समावेश होता.  

छायाचित्र :भारत इंग्लंड संयुक्त उद्योजक झुम बैठक.