*हुतात्म्यांचे स्मरण हे आपले कर्तव्यच – आ. चंद्रकांतदादा पाटील.*

Share This News

आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहो यासाठी हजारो सैनिकांनी हौतात्म्य पत्कारले, अश्या वीरांच्या स्मृती जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.उद्यम विकास सहकारी बँकेच्या देशातील युद्ध स्मारकांची माहिती देणाऱ्या कॅलेंडरच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी, माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर,पांडुरंग कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक महेंद्र काळे, मनोज नायर,गोकुळ शेलार व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे इ उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरही देशाची अखंडता खंडित करण्याचे व हिंदुस्थानाचा भुभाग बळकविण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र भारत मातेच्या वीर सुपुत्रांनी प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन देशाच्या सीमांचे रक्षण केले. अश्या हुतात्मा वीर सैनिकांच्या स्मारकांवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना समाधान लाभले असेही मा. चंद्रकांतदादा म्हणाले. उद्यम विकास सहकारी बँक दर वर्षी सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित करत असते, यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या युद्ध स्मारकांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा संकल्प केला व त्यानुसार माहिती संकलित करुन दिनदर्शिका तयार केल्याचे संचालक संदीप खर्डेकर म्हणाले. उद्यम बँकेकडे 142 कोटींच्या ठेवी असून 9 शाखां मधून पुणे व पिंपरी चिंचवड येथे कारभार चालतो असे बँकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी म्हणाले.5 लाखा पर्यंतच्या ठेवी संरक्षित असून ग्राहकाभिमुख सेवा हे आमचे वैशिष्ट्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे यांनी सांगितले