‘कर्जदारांना फसवल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड’चे कॅप्री गलोबल हाऊसिंग फायनान्स कंपनीसमोर धरणे आंदोलन…’*

Share This News

पुणे – कॅप्री गलोबल हाऊसिंग फायनान्स फायनान्स कंपनीच्या वतीने शेकडो खातेदारांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जदारांची फसवणूक करून सदर कर्जदार नागरिकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांना फसवल्या प्रकरणी आपल्या विरोधात *‘संभाजी ब्रिगेड, पुणे शहराच्या वतीने आज शिवश्री. अविनाश मोहिते महानगर अध्यक्ष, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 जून 2021 रोजी आंदोलन करण्यात आले.* ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या वतीने १) पंतप्रधान आवास योजना फसवणूक २) कर्जदारांची मान्यता घेता कर्जाची मुदत वाढवणे. ३) विमा योजना अफरातफर. ४) कर्जाचा हप्ता मध्ये केलेली वाढ… यासारख्या विषयामुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेले आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून आर्थिक फसवणुकीचा आहे. त्याविरोधात आम्ही पुणे, मुंबई व महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपात ‘धरणे आंदोलन’ करणार आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व बँकेचे सभासद उपस्थित होते, बँकेनी केलेल्या कर्जदारांची फसवणुकीच्या निषेधार्थ धरणें आंदोलन झाले, आठ दिवसांचा बँकेला अल्टिमेटम देण्यात आला… आठ दिवसात निर्णय घ्या . मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष शिवश्री अविनाश भाऊ मोहिते, पुणे शहर कार्याध्यक्ष शिवश्री संदीप भाऊ कारेकर, पुणे शहर कार्याध्यक्ष शिवश्री नितीन भाऊ वाघिरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री महादेव मातेरे, पुणे शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष शिवश्री अजय माने पर्वती विधानसभेचे अध्यक्ष कुमार पवार व इतर संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत सविस्तर राज्य सरकारलाही या प्रकरणी दखल घेण्यासाठी भाग पाडणार आहोत.