पुणे येथील समाजिक कार्यकर्ते डॅा. सलील रत्नाकर पाटील यांना नुकताच भुतपुर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार जळगांव येथे प्रदान करण्यात आला. आदिलशाह फारुकी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रम अल्प बचत भवन, जळगांव येथे पार पडला. डॅा. सलील रत्नाकर पाटील यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण संबंधी (वृक्षरोपण) कार्यक्रमासाठी विशेष कार्य केलेले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, पुणे व महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समिती, पुणे च्या वतीने कोरोना काळात देखील अनेक उपक्रम राबवले, त्यांच्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले
छायाचित्र : डॉ.सलील रत्नाकर पाटील