पुणे – (प्रतिनिधी)
“सेवा आरोग्य फाउंडेशन चे कारोना काळातील कार्य प्रेरणादायी असून ज्या ज्या वेळी जी जी आवश्यकता आहे ती देण्याचे कार्य ह्या संस्थेने केले आहे “असे गौरवोदगार *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीभाग संघचालक अनिल व्यास* यांनी काढले.विविध संस्थाच्या मदतीने संघ माध्यमाद्वारे रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,वज्रनिर्धार लसीकरण मोहीम,घे-भरारी, किशोरवयीन मुलींसाठी सांगाती, वस्त्यांमध्ये समृद्धी वर्ग,आरोग्यवर्धन,मोतीबिंदू ऑपरेशन,कारोना रुग्णांना समुपदेशन इ कार्य ह्या संस्थेने केले आहे.
कर्वेनगर येथील केशव -माधव विश्वस्त निधी तर्फे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेल्या कारोना काळातील सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी *अनिल व्यास* बोलत होते.
ह्या प्रसंगी व्यासपीठावर स्वीकृत नगरसेविका मिताली सावळेकर,नगरसेविका वृषाली चौधरी,नगरसेवक सुशील मेंगडे,नगरसेवक राजाभाऊ बराटे,उद्योजक मिलिंद अग्निहोत्री,रा.स्व. संघाचे संभाजी भाग- कार्यवाह सुधीर जवळेकर,कर्वेनगर संघचालक उल्हास जोशी,प्रदीप कुंटे,संजीव बेंद्रे यांची मुख्य उपस्थिती होती
उद्योजक मिलिंद अग्निहोत्री,अनिलजी व्यास,प्रदीप कुंटे,संजीव बेंद्रे,नगरसेविका वृषाली चौधरी,नंदाजी भागवत यांचे हस्ते सेवा आरोग्य फाउंडेशनचे कर्मचारी,डॉक्टर मंडळी,बंधू भगिनींचा पुष्पगुच्छ,गौरवप्रमाणपत्र,दिवाळी मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस वैद्य आशुतोष जातेगावकर ह्यांनी *धन्वंतरी स्तवन* सादर केले.केशव माधव विश्वस्थ निधी चे अध्यक्ष नंदाजी भागवत यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले.संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सेवा आरोग्यचे संचालक प्रदीप कुंटे यांनीं दिली.सेवा आरोग्य फाउंडेशनतर्फे कारोना काळात कोथरूड,कर्वेनगर,बावधन,हिंगणेहोम, उत्तमनगर,शिवणे भागातील पस्तीस वस्त्यांमध्ये २६ हजार रुग्ण तपासणी,मास्क वाटप,गरजूंना धान्य वाटप, कारोना प्रतिबंधक किट,कारोना होऊ नये म्हणून जनजागृती,सिरम इन्स्टिट्यूट,संजीवन हॉस्पिटल व बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक च्या सहकार्याने नऊ हजार लोकांना वज्रनिर्धार लसीकरणचे कार्य केल्याचे प्रदीप कुंटे यांनी यावेळी सांगितले
सुरवातीस *धन्वंतरी दिना* निमित्त धन्वंतरी पूजा वस्ती समन्वयक *काजल कंधारे* यांचे हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अष्टपुत्रे यांनी केले आभार प्रकाश देशपांडे यांनी मानले.कार्यक्रमास कोथरूड,कर्वेनगर,हिंगणेहोम कॉलनी, वारजे,उत्तमनगर,शिवणे येथील सेवा आरोग्य मध्ये काम करणारे स्वयंसेवक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————-
कोरोना योद्धा सेवा आरोग्य फाउंडेशनच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका मोहोळ यांचा सत्कार करतांना केशव माधव विश्वस्तचे प्रकाश देशपांडे,सेवा आरोग्य फाउंडेशन चे संचालक सतीश जोशी,संचालक संजीव बेंद्रे