प्रेरक लेखक श्री. दत्ता जोशी* यांनी लिहिलेल्या व *‘पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान’च्या* वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या *‘तुम्ही बी घडा ना’* या पुस्तकाचे प्रकाशन आज (मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021) नवी दिल्ली येथे *केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा* यांच्या शुभहस्ते साजरे झाले.

Share This News

*प्रेरक लेखक श्री. दत्ता जोशी* यांनी लिहिलेल्या व *‘पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान’च्या* वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या *‘तुम्ही बी घडा ना’* या पुस्तकाचे प्रकाशन आज (मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021) नवी दिल्ली येथे *केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा* यांच्या शुभहस्ते साजरे झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या पूर्व कार्यकर्त्यांच्या कर्तृत्त्वाचा आणि सामाजिक बांधिलकीचा परिचय देणार्‍या, विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ता असलेल्या लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन विद्यार्थी परिषदेच्याच संस्कारात घडलेल्या आणि गृहमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या पूर्व कार्यकर्त्याच्या शुभहस्ते व्हावे, हा अपूर्व योग या निमित्ताने जुळून आला.

‘ज्ञान – चारित्र्य – एकता’ या त्रिसूत्रीचे पालन करीत सन 1949 पासून भारतभरातील विद्यार्थी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्कारांतून देशभरात आजवर लक्षावधी कार्यकर्ते विकसित झाले. परिषदेने त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांच्यावर केलेल्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही पडला. आपापल्या क्षेत्रांत योगदान देताना त्यांच्या कामावर या संस्कारांचा काय प्रभाव पडला, समाजातील उपेक्षित घटकांना त्यापासून कोणता लाभ झाला, सुसंस्कृत व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर त्या क्षेत्रात त्यांनी कोणते परिवर्तन घडवून आणले याचा प्रातिनिधिक परिचय महाराष्ट्रभरातून निवडलेल्या 25 पूर्व कार्यकर्त्यांच्या या संकलनात करून देण्यात आला आहे.

‘पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात ‘पद्मश्री’ श्री. मिलिंद कांबळे (पुणे), ‘पद्मश्री’ डॉ. स्मिता कोल्हे (बैरागड, मेळघाट), डॉ. जयंत कुलकर्णी (व्हीबीआयटी, हैदराबाद), डॉ. राजेेंद्र हिरेमठ (पुणे), डॉ. प्रसाद व डॉ. हर्षदा देवधर (सिंधूदुर्ग), श्री. प्रमोद कुलकर्णी (सेवावर्धिनी, पुणे), श्री. अजित जोशी (चंडीगढ – हरियाना), सौ. माधुरी सहस्त्रबुद्धे (नई दिल्ली), श्री. सुनील गोवारदिपे (खैरगाव भेदी, यवतमाळ), श्री. अविनाश देशमुख (पुणे), श्री. धनंजय चंद्रात्रे (पुणे), श्री. परेश प्रभू (पणजी, गोवा), सौ. शीतल भाला (जालना), सौ. सविता सादमवार (गडचिरोली), डॉ. सुजित निलेगावकर (पुणे), श्री. प्रशांत अवचट (शिरूर), श्री. गुलाबराव जाधव (मुंबई), दाज्या पावरा (तळोदा, नंदुरबार), श्री. शिवाजी दहिबावकर (मुंबई), श्रीमती प्रमिलाताई कोकड (जव्हार, पालघर), श्री. सुरेश चव्हाणके (नोएडा – नवी दिल्ली), डॉ. रश्मिनी कोपरकर (नवी दिल्ली), डॉ. गिरीश कुलकर्णी (नगर), डॉ. कदम, डॉ. बेद्रे व डॉ. चाकूरकर (नाशिक) आणि श्री. संजय वझे (मुंबई) यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत.

पुस्तकाचे लेखक श्री. दत्ता जोशी, प्रकाशक व पोलाद उद्योगसमूहाचे संचालक व पुस्तकाचे प्रकाशक श्री. सुनील गोयल, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक आणि ‘आयआयएम – जम्मू’चे चेअरमन श्री. मिलिंद कांबळे, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजय पाचपोर, ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेचे केंद्रीय प्रशासकीय संपर्क प्रमुख श्री. शरद चव्हाण आणि ‘जेएनयू’तील आंतरराष्ट्रीय अध्ययन संस्थान अंतर्गत रशिया आणि मध्य आशिया अध्ययन केंद्रातील प्राध्यापिका डॉ. रश्मिनी कोपरकर यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे हे सर्व जण विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्तेच आहेत.

फोटो कॅप्शन ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर आधारित ‘तुम्ही बी घडा ना’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी डावीकडून ‘जेएनयू’मधील प्रा. डॉ. रश्मिनी कोपरकर, ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे श्री. शरद चव्हाण, ‘डिक्की’चे पद्मश्री श्री. मिलिंद कांबळे, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा, लेखक श्री. दत्ता जोशी, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजय पाचपोर व  प्रकाशक तथा उद्याेगपती श्री. सुनील गोयल.