एकता प्रतिष्ठान पुणे व यासीन भाई शेख यांच्या वतीने रोजा इफ्तार संपन्न

Share This News

एकता प्रतिष्ठान पुणे व यासीन भाई शेख मित्र परिवाराच्या वतीने माता रमाई आंबेडकर रोड विभागामध्ये रमजान या पवित्र महिन्याचे औचित्य साधून सर्वांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी प्रायव्हेट रोड या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय प्रताप जी मानकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जी जाधव साहेब, पोलीस उपनिरीक्षक माननीय अक्षय कुमार गोरड साहेब उपस्थित होते. समाजात वावरत असताना सर्वांनी सर्वधर्मसमभाव ही भूमिका ठेवून सामाजिक सलोखा प्रस्थापित ठेवण्याचे काम केले पाहिजे व एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे असे मत प्रताप जी मानकर साहेब यांनी व्यक्त करून सर्व मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच महत्त्वाची बाब म्हणजे रमजान महिन्याचे औचित्य साधून स्वतः एक दिवसाचा उपवास त्यांनी धरला. ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचे आयोजक यासीन शेख यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व जनतेचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी माता रमाई आंबेडकर रोड विभागातील सर्व सामाजिक धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन एकता प्रतिष्ठानचे बसवराज नाईक, प्रमोद गायकवाड, शौकत नदाफ, व एकता प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी केले.