रोटरी क्लब साऊथच्या वतीने माजी प्रशासकीय अधिकारी(आय ए एस) श्रीनिवास सोहनी यांना ज्येष्ठउद्योजक व लेखक प्रतापराव पवार यांच्या हस्ते “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार”(व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड)प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच काश्मीर मध्ये सेवा कार्य करणार्या अधिक कदम यांना मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. नितू मांडके सभागृह टिळकरोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. अरुण कुदळे , रोटरी क्लब साऊथचे अध्यक्ष रो.अतुल अत्रे, सचिव रो कृष्णकिरण वेलणकर, माजी अध्यक्ष रो.राजेंद्र गोसावी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्रतापराव पवार यांनी हल्लीच्या काळात काही हेतु ठेवून विशिष्ट जाती,समाज व्यक्ति यांची बदनामी केली जाते,त्यामुळे वाईट परिणाम होतात कारण अनेकदा याची सत्यता तपासली जात नाही असे संगितले. सत्काराला उत्तर देताना श्रीनिवास सोहनी यांनी अफगाणिस्थान,भारत,पाकिस्तान,बांगला देश,श्रीलंका हे जरी राजकीय दृष्ट्या वेगळे असले तरी या संपूर्ण उपखंडाची संस्कृती,नितीमूल्ये ही एकच आहे असे प्रतिपादन केले.
छायाचित्र :डावीकडून अतुल अत्रे,श्रीनिवास सोहनी,प्रतापराव पवार,अरुण कुदळे,कृष्णकिरण वेलणकर.