रोटरी क्लब पिंपरीच्या वतीने बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे व अन्नमाता ममताताई भांगरे यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान.

Share This News

रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने बिजमाता पद्मश्री सौ.राहीबाई पोपेरे, आणि अन्नमाता ममताताई भांगरे यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे  भावी प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते “व्होकेशनल एक्सलंस अवॉर्ड” (व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार)प्रदान करण्यात आला. नुकताच ऑर्किड हॉटेल बालेवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार, रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष रो.अभिजीत शिंदे, सेक्रेटरी रो.पवन गुप्ता, व्होकेशनल डायरेक्टर रो.सनी सोलंकी,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना राहीबाई पोपेरे यांनी आपल्या देशी वाणांचे जतन करण्यासाठी गावागावात बीज बँका झाल्या पाहिजे असे संगितले. शाल,श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.  

छायाचित्र :डावीकडून पवन गुप्ता, अनिल परमार, राहीबाई पोपेरे, अभिजीत शिंदे, सनी सोलंकी.