रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा मेडिकल प्रोजेक्ट.

Share This News

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी मेडिकल प्रोजेक्ट अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे मासुळकर काॅलनी येथे शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर आणि आय हाॅस्पिटल येथे नवीन आॅपरेशन थिएटर साठी ७.५० लाख रुपये किंमतीचे OT Lamps रोटरी क्लब डायनॅमिक भोसरी चे मेडिकल प्रोजेक्ट डायरेक्टर रो.योगेश गाडेकर यांच्या संकल्पनेतून व दातृत्वातून आज गांधी जयंतीचे औचित्य साधत PGI YCM चे अधिष्ठाता (Dean) मा.डाॅ.राजेद्र वाबळे सर, मुख्य आरोग्य अधिकारी मा.डाॅ.लक्ष्मण गोफणे‌ सर व अतिरिक्त मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार तसेच बायोमेडिकल इंजिनिअर श्री.लोंढे, मुख्य परिचारिका सौ.दळवी,नाईक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष रो.दिपक सोनवणे,सचिव रो.डाॅ.संतोष मोरे, मेडिकल व पब्लिक इमेज डायरेक्टर रो.डाॅ.योगेश गाडेकर,सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रो.आण्णासाहेब मटाले,लिटर्सी डायरेक्टर रो.प्रा.सचिन पवार,क्लब ट्रेनर‌ रो.विजय गोरडे,रो.भूषण व नंदकुमार तोष्णिवाल, तसेच अॅड.श्री.संदीप गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रक्रिया गृहास लोकार्पण करण्यात आले.
यावेळी लॅंप स्वीच आॅन करून उद्घाटन करण्यात आले.डाॅ.राजेंद्र वाबळे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध नवनवीन वैद्यकीय सुविधांची माहिती देत रोटरी क्लबचे या कामी नेहमी सहकार्य राहिले असल्याचे सांगितले.मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात निमसरकारी रुग्णालयांमधील सर्वाधिक चांगली रूग्ण सेवा देणारे पहिले रूग्णालय असल्याचे सांगून रोटरी क्लब व सामाजिक जाणीव असणाऱ्या संस्था नेहमीच या रुग्णालयाच्या प्रशासनाला हातभार लावत असतात.डाॅ.अभयचंद्र दादेवार यांनीही रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या माध्यमातून यापूर्व‌काळात बेबी वाॅर्मर मशीन,ई
सी.जी.मशीन व सध्या आॅपरेशन थिएटर लॅंप दिल्याबद्दल रोटरीचे रुग्णसेवेमधील कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.अध्यक्ष दिपक सोनवणे, रो.डाॅ.संतोष मोरे,रो.आण्णासाहेब मटाले,रो.विजय गोरडे,सी.ए.भूषण नंदकिशोर तोष्णिवाल यांच्या हस्ते सर्व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी तसेच स्टाफ यांचा सन्मान करण्यात आला.व
प्रास्तविक मेडिकल प्रोजेक्ट डायरेक्टर डाॅ.योगेश गाडेकर यांनी तर आभार प्रा.सचिन पवार यांनी मानले.