पुणे स्थित रेलफोर फाउंडेशन ने 5 NGO ना त्यांच्या समाजसेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी मान्यता देऊन दिवाळी साजरी केली. प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला 10 लाख रुपये उत्कृष्टतेच्या प्रमाणपत्रासह या वेळेस देण्यात आले. मा दीपक नाथानी यांनी त्यांच्या मातोश्री पुष्पा नाथानी यांच्या स्मरणार्थ दि १४ ऑक्टोबर या दिवशी सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या पुण्यातील ५ सामाजिक संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले. संपूर्ण महाराष्ट्रातून वृद्ध व्यक्तींची आरोग्यसेवा आणि आदिवासी विकास, शिक्षण आणि युवा सक्षमीकरण, सेवा करणाऱ्या व्यक्ती अशा विविध श्रेणींमधून पुष्पा नथानी पुरस्कार प्राप्तकर्त्यांची निवड करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांसाठी काम करणार्यांना सामाजिक कार्यकर्त्याना त्यांच्या निस्वार्थ सेवे करिता पुरस्कार देण्यात आला. हे प्रतिष्ठित पुष्पा नथानी पुरस्कार मिळालेल्या 5 स्वयंसेवी संस्थांमध्ये निर्मल सेवा फाउंडेशन उरळीकांचन, पुणे. गोपाळ नवजीवन केंद्र, तळेगाव पुणे. हेलपिंग हॅन्ड सोशल फाउंडेशन, शोध बहुउद्देशीय संस्था, वाघोली. माझा घर फाउंडेशन हिंजेवाडी, पुणे. सर्व पुरस्कार विजेत्यांनी मान्यता आणि मिळालेल्या अनुदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ज्यामुळे त्यांना त्यांचे उदात्त कार्य चालू ठेवण्यास मदत होईल. sevadeep.org हे देणगीदारांना स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यासाठी एक ऑनलाइन देणगी प्लॅटफॉर्म आहे, जिथे देणगीदार त्यांचे जुने/ नवे फर्निचर, उपकरणे, कपडे इत्यादी त्यांच्या पसंतीच्या व गरजू संस्थेना दान करता येतात. सेवादीप हा Relfor Foundation चा एक उपक्रम आहे जो तलावांचे खोलीकरण, आदिवासींसाठी कायमस्वरूपी पक्के घरे बांधणे, गावातील शाळांमध्ये शौचालये बांधणे, अनेक वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांसाठी हॉल आणि गार्डन्स बांधणे यासारख्या विविध सामाजिक कल्याणकारी प्रकल्पांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. रेल्फर फाऊंडेशन अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र देखील चालवत आहे. गेल्या 18 महिन्यांपासून कोविड लॉकडाऊनच्या काळात सेवादीप स्वयंसेवक ससून हॉस्पिटल आणि विविध कामगार शिबिरांच्या बाहेर मोफत जेवणाचे डबे वाटप करत आहेत. “सेवादीप प्लॅटफॉर्म सामाजिक संस्थेच्या गरजा आणि पूर्तता यांच्यातील अंतर कमी करूण्यासाठी ही एक सामाजिक चळवळ उभा करण्यात आली आहे, या मध्ये सर्व संस्था व दात्यांनी सहभागी व्हावे” असे रेल्फोर फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक नाथानी यांनी या वेळेस सांगितले. कार्यक्रम प्रसंगी रेलफोर फाउंडेशनचे चेअरमन दीपक नाथानी, केदार साबणे, अरुण नाथानी, टीना नाथानी, राज नाथानी व संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते. छायाचित्र : टीना नाथानी, शीना नाथानी, रेलफोर फाउंडेशनचे चेअरमन दीपक नाथानी, अरुण नाथानी, राज नाथानी