रोटरी युवा* पुणे आणि *देवतरु फोंडेशन* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथे पहिले *महिला आरोग्य केंद्र* सुरु करण्यात आले

Share This News

रोटरी युवा* पुणे आणि *देवतरु फोंडेशन* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथे पहिले *महिला आरोग्य केंद्र* सुरु करण्यात आले आहे .महिला आरोग्य केंद्राचे उदघाटन पुण्याचे *महापौर श्री .मुरलीधर मोहोळ* ह्यांच्या हस्ते झाले. ह्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी महानगरपालिके तर्फे मदतीचे आश्वासन दिले प्रमुख पाहुणे *श्री पंडित शिवकुमार श्री* ह्यांनी मार्गदर्शन केले *रोटरी युवाच्या प्रेसिडंट सौ तृप्ती नानल ,मेडिकल डायरेक्टर आणि देवतरु फोंडेशन चे संचालक श्री अजय कुलकर्णी* *सेक्रटरी सौ दीपा बडवे* ,*दीपिका खिंवसरा संचालिका देवतरु* आणि उपस्थित सर्व क्लब सदस्य आणि *सह प्रांतपाल शिरीष पुराणीक* क्लबचे माजी अध्यक्ष *श्रीकांत जोशी , राहुल गडकरी, मनोज धारप*ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला . *कांचन ताई कुंबरे ह्यांच्या ” ती “च्या आरोग्या साठी* प्रकल्प अंतर्गत राबविण्यात आला . सदरील आरोग्य केंद्रासाठी *कांचन ताईचे* विशेष सहकार्य आणि सहभाग लाभला . महिला आरोग्य केंद्र चालविण्याची जबादारी देवतरु फोंडेशन ने घेतली असून तज्ज्ञ डॉक्टर्स आणि संपूर्ण मेडिकल स्टाफ सह केंद्र चालू राहील . आरोग्य केंद्रामधून औषोधपचार आणि सर्व वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात येतील असे देवतरु च्या संचालिका सौ दीपिका खिंवसरा ह्यांनी सांगितले . पुढील वर्षात देवतरु कडून असे किमान ५ महिला आरोग्य केंद्र शहराच्या विविध भागात चालू करण्याचा मानस आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता मडके ह्यांनी केले व निनाद जोग ह्यांनी आभार मानले