पुणे (दि.१३) रोटरी क्लब स्पोर्ट सिटीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या बाल कल्याण संस्था येथे श्री गणेश आरती करण्यात आली. या प्रसंगी तृतीयपंथी लोकांनी बनविलेल्या शिखंडी या ढोल पथकाने वादन केले. त्यांचा सत्कार करण्यात आला. मुलांना खाऊ व प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटीच्या अध्यक्ष साधना जोशी, सचिव समीर गुप्ते,माजी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.महेश कोटबागी,रमेश रोडे,बालकल्याण संस्थेच्या विश्वस्त अपर्णा पानसे, शिखंडी पथकच्या प्रेरणा वाघेला, कादंबरी शेख, मानसी गोविलकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते. तृतीय पंथी लोकांनाही सन्मान मिळून ते सुद्धा आपल्यातीलच माणसे आहेत असा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे साधना जोशी यांनी नमूद केले.
छायाचित्र : १) साधना जोशी अध्यक्ष,महेश कोटबागी रमेश रोडे व शिखंडी पथक. २) विद्यार्थी विद्यार्थिनी.