महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष खा.प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशअध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या निर्देशाने विवेक दत्तात्रय पवार यांची पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टीच्या सांस्कृतिक विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे कार्यालय येथे चित्रपट,साहित्य- कला व सांस्कृतिक विभाग पुणे शहर अध्यक्ष विजय कदम यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. याचे स्वागत दीपकजी मानकर, पार्थ पवार, हर्ष मानकर, विजय कदम, यांनी केले. या प्रसंगी नवनियुक्त उपाध्यक्ष विवेक पवार यांनी आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्य सांस्कृतिक विभागाद्वारे तरुण व नागरिकांपर्यत पोचविण्यासाठी कार्य करणार असल्याचे नमूद केले. छायाचित्र : विवेक पवार.