“अयोध्येतील रामलल्ला मंदिर जगात सर्वात सुंदर मंदिर.”- हरीश परदेशी.

Share This News

आज आयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त देशभर सर्वत्र दिवाळी प्रमाणे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नमो फौंडेशन च्या वतीने सातारा रस्ता पद्मावती जवळ संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाआरती,दिपोत्सव, प्रसाद व आतिषबाजी यांचा समावेश होता. या कार्यक्रम प्रसंगी कारसेवक प्रसेनजित फडणवीस, भूषण करमरकर, महेश काळे, सलोनी पांयाळ, ब्रम्हकुमारी अरुणादिदी, व आयोजक हरीश परदेशी, अनिल जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आ.माधुरीताई मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना हरीश परदेशी यांनी अयोध्येत निर्माण करण्यात आलेले रामलल्ला मंदिर हे जगातील सर्वात सुंदर मंदिर असल्याची भावना व्यक्त केली. छायाचित्र : महाआरती करतांना मान्यवर.