पुणे : आज दिनांक 22 ऑक्टोबर, शुक्रवारी, सकाळी 10:30 वाजता, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे रंगकर्मीचे दैवत नटराज व रंगमंचची पूजा करण्यात आली. ही पूजा प्रसिद्ध अभिनेते सौरभ गोखले, रंगभूषाकार बाळ जुवाडकर, नाट्यकर्मी संजीव कुमार पाटील, निर्माता बाळासाहेब बांगर, दिग्दर्शक शिवा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अनेक रंगकर्मी हजर होते. यावेळी विजय पानसरे, सुहास वैद्य, अभिनेत्री सोनिया गोळे, पी. चंद्रा, शिवाजी वाघमारे, निर्माते सतीश फुगे, अभिनेते काळूराम डोबळे, अभिनेत्री रुपाली पाथरे, मृणाल कुलकर्णी, मारुती पोखरकर हजर होते.
यावेळी फिरोज मुजावर यांनी नमन नृत्य सादर केले. तसेच अभिनेते सौरभ गोखले, बाळासाहेब बांगर, शिवा बागुल, संजीव कुमार पाटील, सतीश फुगे, विजय पानसरे यांनी मोनगते व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये सौरभ गोखले यांनी सांगितले की, “आपण आता भूतकाळ विसरून भविष्यात निर्माण होणाऱ्या संधी कडे लक्ष देऊ या.” आणि त्यांनी पुन्हा अशी अडचणीची वेळ रंगकर्मीवर येऊ नये म्हणून नटराज चरणी प्रार्थना केली. तसेच या कार्यक्रमात दिग्दर्शक शिवा बागुल यांनी नाट्यगृह व सिनेमा गृह चालू करण्यासाठी रंगकर्मी संघटकांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली व आज नाट्यगृह चालू केले म्हणून शासनाचे आभार मानले. निर्माते बाळासाहेब बांगर यांनी आपल्या मार्गदर्शनात रंगकर्मीच्या अडचणीबाबत सर्वांचे लक्ष वेधले. रंगकर्मीच्या कायम स्वरूपी मागण्या मान्य होईपर्यंत सतत आपण शासनाच्या संपर्कात राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमात रंगकर्मी आंदोलनात सहभागी संघटक यांचा सत्कार सत्कार अभिनेते सौरभ गोखले यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार अभिनेते काळूराम ढोबळे यांनी मानले.
अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिवा बागुल, (दिग्दर्शक) यांनी दिली.