जवानांप्रती दृढ विश्वासाचं बंधन…’रक्षाबंधन’*

Share This News

अग्निशामकच्या जवानांच्या पोलादी मनगटावर बहीण भावाच्या राखीचे प्रेमरूपी बंध बांधून अग्निशामक जवानांच्या कार्याला नुकताच उजाळा देण्यात आला. स्वाती चिटणीस व सुशीला गुंजाळ यांच्या वतीने पुण्यातील गंज पेठ येथील अग्निशामक केंद्र या ठिकाणी रक्षाबंधनादिनी जवानांना त्यांच्या बहिणींची उणीव भासू नये यासाठी त्यांना राख्या बांधण्यात आल्या. या प्रसंगी प्रशांत रणपिसे मुख्य अग्निशमन अधिकारी, सुनील गिलबिले उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि त्याच बरोबर अग्निशमकचे जवान देखील उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना स्वाती चिटणीस म्हणाल्या की भाऊ आणि बहिण यांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. रात्री अपरात्री अग्निशामकचे जवान आग लागली, झाडे पडले अशी कोणतीही मानवनिर्मित अथवा निसर्ग निर्मित कोणतीही आपत्ती आली की स्वतःचा जीव धोक्यात घालून निडरपणे अग्निशामक जवान धावून येतात व सर्वोतोपरीपणे मदत करतात. अशा जवानांप्रती दृढ विश्वासाचं बंधन निर्माण व्हावे म्हणून आम्ही ‘रक्षाबंधन’ सण अग्निशामकांच्या जवानांना सोबत साजरा केला.

प्रशांत रणपिसे मुख्य अग्निशमन अधिकारी बोलताना म्हणाले की आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला चिटणीस व गुंजाळ ताईंनी दाखवलेले आमच्या विषयी स्नेहा बद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीला गुंजाळ यांनी केले तर आभार स्वाती चिटणीस यांनी मानले.