पुणे गणेश फेस्टिवल ने खऱ्या अर्थाने केला पुण्याचा गणपती उत्सव डिजिटल

Share This News

पुणे गणेश फेस्टिवल च्या माध्यमातून यंदा गणपती उत्सवाच्या 10 दिवसात जगातील पावणे चार करोड लोकांनी पुण्याचा गणपती उत्सव अनुभवला म्हणजेच खऱ्या अर्थाने पुण्याचा गणपती उत्सव ग्लोबल -डिजिटल झाला म्हणावे लागेल.पुणे गणेश फेस्टिवल च्या फेसबुक पेज च्या माध्यमातून उत्सवाच्या दहा दिवसात 3,83,02,737 लोकांनी उत्सवाचे अपडेट जाणून घेतले हे विशेष.

याबाबत माहिती देताना पुणे गणेश फेस्टिवल चे संस्थापक स्वप्नील नहार म्हणाले पुणे गणेश फेस्टिवल गेले 12 वर्ष पुण्याचा गणपती उत्सव जगात पोहचावा यासाठी प्रयत्न करत आहे. विविध मंडळाचे लाईव्ह दर्शन, आरती, माहिती, कार्यक्रम आम्ही या दहा दिवसात प्रसारित केले खरं सांगायचं तर एवढा मोठा प्रतिसाद मिळेल हे आम्हाला ही वाटले नव्हते. यंदा आम्ही डिजिटल मोह्त्सवातून “कासव संवर्धनाचा” संदेश दिला त्याला देखील सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आणि कासव घरी न पाळण्या बाबत मोठी जनजागृती झाली हे याहून मोठं यश म्हणावं लागेल.सोशल बाप्पा, पत्रकार बाप्पा हे उपक्रम नागरिकांना विशेष आवडले यात मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
सोशल मीडिया वर मिळालेल्या या रिच ची आकडेवारी मान्यवर मंडळाच्या प्रतिनिधींच्या हस्ते अधिकृत पणे प्रकाशित करण्यात आली.सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते यांनी पुणे गणेश फेस्टिवल च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुण्याचा उत्सव डिजिटल झाला हे सांगताना पुणे गणेश फेस्टिवल च्या टीम चे कौतुक करून गणपती मंडळ आणि नागरिक यांच्यातील दुवा पुणे गणेश फेस्टिवल ठरत असल्याचे सांगितले. साईनाथ मंडळ ट्रस्ट चे पियूष शहा यांनी भविष्यात कासव संवर्धन मोहिमेत विविध मंडळ सहभागी होणार असल्याचे सांगितलं. यावेळी 11 मान्यवर मंडळाचे प्रतिनिधी होते. त्या सर्वांना फेसबुक चे सर्व रिपोर्ट दाखवण्यात आले आणि त्यानंतर ही अधिकृत आकडेवारी त्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली तसेच या गणेशोत्सवाच्या 10 दिवसातील आठवणींना उजाळा देणारे “मोरया मोरया” हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.
यावेळी मान्यवर गणपती मंडळांचे शिरीष मोहिते, पियुष शहा, किरण सोनिवाल, राजू कांबळे, उमेश सपकाळ, प्रितम शिंदे, प्रमोद राऊत, अभिषेक मारणे, कुणाल पवार, अमित जाधव, चेतन शिवले, ओंकार सपकाळ, किरण शेट्टे आणि पुणे गणेश फेस्टिवल डिजिटल पोर्टल ची टीम चे स्वप्नील नहार, जयराज भिसे, शुभांकर भागवत, सोनाली वाहवळ उपस्थित होते.