प्रा.मीना आंबेकर लिखित “कोलाज : समृद्ध विचारांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याच्या अभ्यासक आरती दातार यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन येथील हिंदू जिमखाना यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबिय व स्नेही मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना आरती दातार यांनी या पुस्तकात मानवी मनात येणार्या विविध विचारांकडे सकारात्मक नजरेने पाहून आपले जीवन समृद्ध ठेवावे, व जीवनात आनंद मिळवावा हे सहज सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहे असे प्रतिपादन केले. लेखिका प्रा.मीना आंबेकर यांनी बोलतांना माणसांच्या मनात रोज हजारो विचार येतात व त्याचा परिणाम मानसिक व शारीरिक होतो यासाठी मनाला चांगल्या विचारांकडे सकारात्मक पणे पाहील्यास आनंद मिळतो असे संगितले. मयूर प्रकाशाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास १९० पाने असून किमत २०० रुपये आहे.
छायाचित्र : आरती दातार,मीना आंबेकर व कुटुंबिय.