भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कसबा पेठेतील शहीद अब्दुल हमीद मित्र मंडळाच्या वतीने झेंडा वंदन करण्यात आले. तसेच उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुख्तार शेख, आलीम मुलाणी, बाबुलाल शेख, हाजी रशीद कुरेशी, हाजी आदमभाई, दशरथ कांबळे, गुरु शेख, गुरु बोंबलेकर, राजू मांडववाले आदी मान्यवरांच्या बरोबरच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारची वेशभूषा केली होती.
छायाचित्र : प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात वकील झालेल्या विद्यार्थिनी सोबत मुख्तार शेख.