पुणे
कर्वेनगर पुणे येथील एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट यांना अतिशय प्रतिष्ठित असा
*परमविशिष्ट सेवा मेडल पुरस्कार* (पीव्हीएसएम)
जाहीर झाला असून सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे सायंकाळी पाच वाजता एका खास समारंभात *राष्ट्रपती रामनाथ कोविंद* यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
२६ जाने २० मध्येच हा पुरस्कार जाहीर झाला होता कारोनाच्या प्रादूर्भामुळे पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करणे तेंव्हा शक्य नव्हते.
*प्रदीप बापट* यांना हवाई दलात लढाऊ नियंत्रक (फायटर कंट्रोलर) म्हणून नियुक्ती मिळाली आणि फायटर कंट्रोलर स्ट्रीम या क्षेत्रात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि नंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून दहा वर्षे काम केले.
*एअर मार्शल प्रदीप बापट* यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत ज्यात उपकरणे डेपोचे मुख्य प्रशासकीय अधिकारी,मिराज फायटर तळाचे उपमुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सुखोई -३० तळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ई चा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेतील हॉऊईडस्प्रुड येथे दक्षिण हवाई दलासोबत गोल्डन ईगल नामक संयुक्त सरावात सहभागी झालेल्या शिबिरात भारतीय हवाई दलाच्या सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.
२८ मे ८३ रोजी भारतीय हवाई दलात प्रशासकीय शाखेत नियुक्त झालेल्या *प्रदीप बापट* यांचे विक्रम विद्यापीठ उज्जैन येथून प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले असून सध्या पुण्यात वास्तव्य आहे.