दिल्ली येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र विधीमंडळाच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले विनम्र अभिवादन
न्यू दिल्ली दि.१७ : प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधीमंडळाच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी न्यू दिल्ली महाराष्ट्र सदन येथे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रबोधनकर यांच्या जयंतीनिमित्त साधून दिल्ली येथे वाचन आणि प्रबोधनाचे केंद्र दिल्लीत उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. यासाठी त्या भविष्यात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त श्री श्यामलाला गोयल, मॅनेजर श्रीम. भागवती मेश्राम, उपसभापती कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्री अविनाश रणखांब, अक्षय गाडेकर, किशोर कुमार यांनी देखील यावेळी अभिवादन केले.