गणेशोत्सवामधे अहोरात्र झटलेल्या व कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झालेल्या सर्व पोलीस बांधवांसाठी आरोग्य शिबीर नाना पेठेतील श्री संभाजी मित्र मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आले. सदर शिबीरात पोलीस बांधवांचे ह्रदय ईसीजी तपासणी, दंत चिकित्सा, डोळे तपासणी, हाडांची तपासणी, बीएमआय, हिमोग्लोबीन, बीपी, ब्लड शुगर तपासणी, मॅग्नेटिक बेड ट्रिटमेंट द्वारे सर्व तपासण्या करून पुढील उपचारांची दिशा ठरवून औषधोपचार करण्यात आले. फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या १८० पुरूष व महिला पोलीसांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरातील सुविधांबाबत पोलीसांनी समाधान व्यक्त केले. फरासखान हाॅलमधे एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्याने आमचा खूप वेळ वाचल्याचे पोलीसांनी नमूद केले. शिबिरस्थळी पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, फरासखाना पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, विश्रामबाग पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी भेट देउन सुविधांचा आढावा घेतला. मंडळाचे अध्यक्ष शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि मंडळाचे कार्यकर्ते नरेश लडकत, आकाश खैरे, तेजस जावळकर, आदित्य हरगुडे, अथर्व मोरे, ओंकार झेंडे यांनी परिश्रम घेतले. माजी महापौर स्नेहल आंबेकर, राजेंद्र शिंदे, अनंत घरत, नंदू येवले, नितीन रावळेकर, नागेश खडके, अजय परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, रोहिणी कोल्हाळ, करूणा घाडगे, प्रविणी भोर, स्नेहल जाधव, अमर मारटकर, संतोष भूतकर, दिनेश दाभोळकर, राहुल आलमखाने, युवराज पारीख, नितीन थोपटे उपस्थित होते.