पीएमए – पुणे मॅनेजमेंट असोसिएशनने इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे लोकल सेंटर यांच्या सहकार्याची 50 वर्षे साजरी करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते बिलकेअर लिमिटेडचे सीएमडी श्री मोहन भंडारी आणि निबे इंडस्ट्रीजचे सीएमडी श्री गणेश निबे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि प्राज इंडस्ट्रीजचे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं मुख्य विषय “जागतिकीकरण युग” होता. आपल्या भाषण श्री मोहन भंडारी यांनी कठीण परिस्थितीस न डगमगता वाटचाल करीत राहिला तर यश दूर नाही असा सल्ला विविध उदाहरणे देऊन दिला. श्री गणेश निबे या यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील घटना सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले डॉ उटगीकरांनी जागतिकारणात नवीन प्रोडक्टचे महत्व सांगितले व ते कसे करायचे ते अगदी सोप्या भाषेत विषद केले सुरवातीला असोशिएशनचे अध्यक्ष श्री बाळ पाटील यांनी प्रास्तविक केले, , उपाध्यक्ष श्री प्रदीप तुपे यांनी गेल्या ५० वर्षांचा प्रवास उलगडला व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास उद्योजक आणि मॅनेजमेंट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.