केंद्र सरकारने निम(नॅशनल एम्पलॉयबीटी एनहांन्समेंट मिशन) बंद करण्याचा निर्णय घेतला.या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व एच आर होप्स व व्हायब्रंट एच आर यांच्या संयुक्त विद्यमाने “निम बंद – पुढे काय ?” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या भाऊ इंस्टिट्यूटच्या सभागृहात दिग्गज कंपन्यांचे एच आर, तसेच वकील व एच आर क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी पुना मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, सुहास गर्दे, नितिनकुमार आसलकर, अॅड.अशोक के गुप्ते, अॅड. श्रीनिवास इनामती, डॉ.पराग काळकर, समीर कुकडे (चर्चानियंत्रक-मॉडरेटर). आदी मान्यवर उपस्थित होते. या विषयाचा कायदेशीर- सामाजिक – कामगार संघटना – व उद्योग यावर सखोल चर्चा झाली. व निम बंद झाली तरी ही योजना बंद केल्यामुळे या योजने अंतर्गत सामील असणार्या लाखो विद्यार्थ्यांसामोर व तो चालविणार्या कंपन्यांसामोर मोठा प्रश्न उभा आहे.त्यासाठी सर्वांनी सहकार्याने तोडगा काढावयाचे सर्वानुमते ठरले.
छायाचित्र : डॉ.पराग काळकर,अॅड.अशोक गुप्ते,अॅड.श्रीनिवास इनामती, नितिन असलकर,समीर कुकडे.