“व्यक्ती असो की कंपनी विनम्रता व खंबीरता असलेलेच सर्वोच्च स्थानी पोहोचतात”.- राजीव मित्रा

Share This News

व्यक्ती अथवा कंपनी मग ती कोणत्याही क्षेत्रांत असली तरी विनम्रता व खंबीरता हे गुण असल्यासच सर्वोच्च स्थान मिळवू शकतात, आपण उत्कृष्ट्र असणे पहिली पायरी, टिम असणे ही दुसरी पायरी, ध्येय निश्चित करून कार्य करणे तिसरी पायरी, अंतिम ध्येय ठरवणे ही चौथी पायरी मात्र बहुसंख्य इथेच थांबतात. सर्वोच्च स्थान मिळवू शकत नाही. विनम्र व खंबीर हे दोन गुण असल्यासच सर्वोच्च स्थान प्राप्त होते”.असे असे प्रतिपादन राजीव मित्रा (सीईओ प्रभात डेअरी) यांनी केले. ते पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आयोजित व्यवस्थापनाची सर्वोच्च पातळी( लेव्हल ५) या मार्गदर्शन सत्रात मार्गदर्शन करीत होते. हॉटेल आशीष प्लाझा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ.संजय गांधी(पीएमए चेअरमन), प्रदीप तुपे(व्हाईस चेअरमन), अनिल वळसणकर(नॅशनल कन्व्हेनर एसडिएम). सचिन ईटकर(प्रोग्राम अॅडव्हायझर स्टँटेजिक फोरसाईट), आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राहुल जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

छायाचित्र : डावीकडून दत्तात्रय खलिपे,प्रदीप तुपे,अनिल वळसणकर,विवेक देशपांडे,राजीव मित्रा,सचिन ईटकर,संजय गांधी.