युवकांना रोजगारासाठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार संपन्न.

Share This News

सव्वा लाख युवकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी राज्याच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्रालय आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व अन्य ४४ संस्था यांच्यात समंजस्य करार(MOU) संपन्न झाला. राजभवन मुंबई येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महामाहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खातेप्रमुख मनीषा वर्मा, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप तुपे, उपाध्यक्ष संजय गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्याच्या समतोल विकाससाठी ग्रामीण भागातील युवकांना कुशल प्रशिक्षण देवून रोजगार मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले. या सामंजस्य कराराने ग्रामीण भागातील युवकांना विशेषत: शिक्षण अपूर्ण राहिलेल्या युवकांना त्यांच्या योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रदीप तुपे यांनी नमूद केले.

छायाचित्र : सामंजस्य करार प्रसंगी मान्यवर.