प्राचीन भारतीय पटखेळ शिकण्याची व खेळण्याची संधी.

Share This News

पुणे (दि.१) हल्ली बहुतेक लोकांचा वेळ मोबाईलवर जात आहे. आपले प्राचीन भारतीय पटखेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लोकांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा व आपल्या प्राचीन भारतीय पटखेळांची माहिती व्हावी. यासाठी सौ.श्रिया दीक्षित नाचरे यांनी १२ मे २०२४ रोजी हे खेळ शिकण्याची व खेळण्याची संधी मिळावी यासाठी कार्यक्रमाची आखणी केली आहे. या कार्यक्रमासाठी नाममात्र शुल्क २५ रुपये आहे. हा कार्यक्रम बाजी पासलकर सभागृह राजाराम पुलाजवळ सिंहगड रस्ता येथे संपन्न होईल. वेळ संध्याकाळी ५.०० ते ७.०० अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्रिया मो.9373693476,मुक्ता मो.77220807660.