“उद्योग व्यवसायात यश हे फक्त उद्योजकाच्या नव्हे तर संपूर्ण टिमच्या प्रयत्नाने शक्य होते. मोठे होण्यासाठी नेहमी योग्य टिम बनवून त्यांना प्रेरित करून काम केले पाहिजे. उद्योगाचे ध्येय ठरविताना अमुक इतके मोठे रकमेचे मिलिनियर –बिलिनियर असे लक्ष्य ठरविण्या एवजी योग्य प्रकारे व नीतीने काम केल्यास भरपूर पैसे येतात” असे प्रतिपादन पार्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे यांनी केले. J4E च्या वतीने आयोजित ऑनलाइन उद्योग मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. या सत्रात भारत व जगभरातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विशाल मेठी, वासंती मुळजकर, सपना बापट, गौरव शर्मा, धवल ठक्कर, निलेश कोमटवार, आयुष जैन, वैशाली अपराजित, कपिला तनेजा, चंद्रशेखर लोखंडे यांनी केले.
छायाचित्र : आनंद देशपांडे व आयोजक टिम.