*राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोफत कोविड लसीकरण महाअभियान केंद्रचे उद्घाटन*

Share This News

पुणे: जलद गतीने नागरिकांना लस मिळावी या हेतूने शिवसेना पुणे उपशहर प्रमुख  बाळासाहेब मालुसरे (अध्यक्ष, मंडई विद्यापीठ कट्टा,पुणे) यांच्या वतीने ५१ हजार नागरिकांना मोफत कोविशील्ड लस महाअभियान राबविण्यात येत आहे. कमल स्मृती हाऊस शुक्रवार पेठ, नेहरू चौक, बोंबिल मार्केट लेन ,पुणे येथे आयोजित केलेल्या या महाअभियानाचे उद्घाटन राज्य शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज बुधवारी करण्यात आले. सदर उपक्रमाला ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.नीलमताई गोर्हे (उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद), सचिन आहिर (संपर्क प्रमुख), आदित्य शिरोडकर (सहसंपर्क प्रमुख), शहर प्रमुख गजानन थरकुडे, डॉ.आर्य (सीईओ, विलू पुनावाला हॉस्पिटल), श्री.मॅथ्यू चंडी (संचालक, CORE) आदी प्रमुख मान्यवर, शिवसैनिक, युवा सैनिक, लस लाभार्थी नागरिक उपस्थितीत होते. मोहिमेसाठी विषेश सहकार्य विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल व कोर संस्था-अमेरिका यांचे लाभले आहेत.

*बाळासाहेब मालुसरे म्हणाले,* कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना जीव गमवावा लागले, तर आजही राज्यातील अनेक रुग्ण या महामारी सोबत लडत आहेत. कोरोना संसर्गापासून जर स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकांनी लस घेऊन स्वतःची जवाबदारी पुर्ण करणे आवश्यक आहे. या उद्देशाने या मोफत लसीकरण अभियान आम्ही राबवले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले याबद्दल त्यांचे तसेच नीलमताई गोर्हे समवेत अन्य सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.