*जपानमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुरू असल्याचे पाहून आणि येथील मंदिरांतील शांतता पाहून मनाला समाधान वाटले : डॉ.नीलम गोऱ्हे* *जपानमध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या सदस्यांची वाकायामा विधानसभा आणि कोयासान विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भेट आणि अभिवादन ……* डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या भाषणाने दोन्ही ठिकाणी झाले सदस्य भावनाशील…

Share This News

जपान  ता. १८: जपानमधील वाकायमा विधानसभा येथे आज महाराष्ट्राच्या उच्चस्तरीय समितीने भेट दिली. यावेळी कोयासन काँगोबु डांजो गरान मंदिरालही भेट दिली. यासाठी भारतीय  दूतावासाने आणि वाकायामा विधानसभेने पुढाकार घेतला होता. येथील राज्यपाल शिमो हिरोशी यांनी याबाबत नेतृत्व आणि अगत्याने आदरातिथ्य केले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जापनीज शासनाच्या औपचारिक प्रघातानुसार महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची नेता म्हणुन अभिवादन केल्यावर भाषण केले .

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
“भारत आणि जपानचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आणि परंपरा असलेले आहेत. ते अनेक शतकांपासून आहेत आणि  सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारातून भारतामध्ये जो विचार निर्माण झाला, तो जगामध्येही प्रसिद्ध झाला.  बरीचशी आव्हाने पेलत असतानाच एक वेगळेच बुद्धांचे तत्वज्ञान विचाराचे स्वरूप समोर आले आहे व ते जगाच्या मनात विश्वमैत्रीचा पाया रूजवणारे आहे.
कारण जगामध्ये अहिंसा आणि क्षमा हे दोन मुद्दे परत एकदा अधोरेखित झाले आहेत.
जपान मधील वाकायामा शहर आणि पुणे महानगरपालिका यांचा विविध प्रश्नांवरती करारनामा झालेला आहे.  त्या पार्श्वभूमीवर अजून काही काम एकत्र होणं अपेक्षित आहे.     महाराष्ट्र विधिमंडळाचे आमदार आलेले आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार त्यांचे जे मुद्दे त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा,त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे आणि विविध प्रकारचे विषयातील आदर्श कार्यपद्धती आहेत, त्याची माहिती होणं या दृष्टिकोनातून आज इथल्या मंदिरांमध्ये शांतता तसेच शिस्त पाहिल्याने आम्हाला विशेष समाधान वाटलं.”

जपानमधील प्रसिद्ध असलेल्या कोयासान विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भेट देऊन अभिवादन केले.
या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये केल्याचे यावेळी समजले. या शिष्टमंडळाची प्रमुख म्हणून यावेळी *महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथेही आपले पुढील विचार मांडले.*

कोयासांन विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे अभ्यास सुरू आहेत.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन जागतिक स्तरावरती मानवाधिकारांची
मोठी मोहीम सुरू केली आहे.  त्याच्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिकण्याचे आणि संघर्षाचे आवाहन केलं, पण सत्ता कशी राबवावी, विकास नव्हे तर कशा प्रकारचा शासन असावं, त्याच्याबद्दलही त्यांच्या कल्पना अनेक होत्या.  त्याचा अभ्यास होणार आवश्यक आहे आणि त्यामुळे ह्या पुतळ्याच्या निमित्ताने आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशा प्रबोधनकारी व्यक्तींच्या बद्दल मनातून आदर वाटतो. त्यामधल्या ऋणाची भावना आमच्या मनात त्यांच्याबद्दल जरूर आहे.  त्या ऋणातून आजचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहोत. हे आम्ही आमच्या आयुष्यातील फार मोठे भाग्य आणि संधी आहे असं समजतो आणि त्या दृष्टीने आमचे शिष्टमंडळ नक्की काम करेल,

या दोन्ही भेटीच्या वेळी त्यांनी चांगली व्यवस्था केली होती आणि विद्यापीठाच्या कार्यक्रमांमध्ये तिथे गव्हर्नर यांची मदत ही झाली.

भेट दिलेल्या मंदिरातल्या महत्त्वाचे म्हणजे तिथल्या धर्मगुरूनीही भाषण केलं आणि ते भारतीय दूतावसाच्या अधिकाऱ्यांनी भाषांतरित केला.

हे दोन्ही कार्यक्रम  वोकायामा  प्रेफरेन्शियल असेंबली यांनी दोन्ही ते मंदिराची भेट आणि हे दोन्ही त्याने आयोजित केली होती. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सचिव श्री.राजेंद्र भागवत , आ.गीता जैन, आ.श्वेता महाले, आ.विक्रम काळे, आ.मनीषा कायंदे, आ.रमेश पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, आ.किरण सरनाईक, आ.संजय बनसोडे, आ.चेतन तुपे, आ.राजहंस सिंह, आ.बाबासाहेब पाटील, आ.संजय जगताप, आ.किशोर दराडे, आ.जयंत आसगावकर, आ.लहू कानडे ,आ.नरेंद्र भोंडेकर, क्षितीज ठाकूर उपस्थित होते.