प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी आणि माननीय मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांची सुकन्या कीर्ती फाटक आणि सर्व करंदीकर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या या नात्याने माननीय संजीवनी करंदीकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिवसेना परिवाराला असलेला मायेचा आणखी एक हात आज गमावला आहे. त्यांच्या जाण्याने झालेले दुःख कधीही भरून न येणारे आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा, त्यांनी आयुष्यामध्ये दाखवलेले धाडस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासातून तयार झालेली समाजाच्या प्रश्नांकडे पाहण्याची अभ्यासपूर्ण दृष्टी त्यांनी जोपासली होती. त्यांची शिकवण, संस्कार आणि विचार यांचे ऋण शिवसेना परिवारावर कायमच राहतील.