मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या पवित्र दिनानिमित्त विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी पुण्याचे श्रद्धास्थान असणार्या दगडूशेठ दत्त मंदिरात श्री गुरुदत्त दर्शन व महाआरती केली, तसेच दत्त जयंतीच्या अभिषेकाची पूर्तता केली. या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्रात शांतता सुख समृद्धि व्हावी. अशी प्रार्थना केली. तसेच नुकतेच आपण परदेशात जावून आलो तेथील सर्व कार्यक्रम छान पार पडले, कोरोनाचा धोका असाच कमी होत जावो अशी ही प्रार्थना केल्याचे संगितले. या प्रसंगी ट्रस्टी युवराज गाढवे,शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र शिंदे,उपसभापती कार्यालयाचे सदस्य व भाविक नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र :श्री गुरुदत्तांची आरती करतांना नीलमताई गो-हे व अन्य