“दिवाळी पहाट हा कार्यक्रम सर्वांसाठी जणूकाही मुक्त व्यासपीठ ठरत आहे’. – ना.डॉ.नीलमताई गो-हे

Share This News

दिवाळी निमित्त सर्वत्र विविध दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न होत आहेत. यात फक्त कलाकारच नव्हे तर सर्वसामान्य गृहिणी, युवक युवती अशा सर्वांना जणूकाही कला सादर करण्याचे मुक्त व्यासपीठ ठरत आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे भूषण असलेले गडकोट यांचे ही या निमित्ताने सर्वांना स्मरण होते त्यांचे संवर्धन करण्याचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करीत आहेत”, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.नीलमताई गो-हे यांनी केले. दिवाळी निमित्त माजी नगरसेवक राजू पवार यांनी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात त्या बोलत होत्या.चित्तरंजन वाटिका येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक राजू पवार, सहसंपर्क प्रमुख शिरोडकर, पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, मा.नगरसेवक बाळासाहेब बोडके, सुप्रसिद्ध कलाकार स्वप्नील बांदोडकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते. स्वप्नील बांदोडकर व त्यांच्या कलाकार वृंदानी विविध गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

छायाचित्र : स्वप्नील बांदोडकर यांचा सत्कार करताना नीलम गो-हे,आदित्य शिरोडकर राजू पवार,संजय मोरे,गजानन थरकुडे.