समस्त कलांचा निर्माता नटराज यांचे पूजन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पूजन करून नाट्यक्षेत्राचे पुनरागमन करण्यात आले.बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या या नटराज पूजन प्रसंगी ज्येष्ठ कलाकार लीला गांधी,संवाद पुणेचे सुनील महाजन,निकिता मोघे,ज्येष्ठ कलाकार रामचंद्र देखणे,सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे,पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे.आदी मान्यवरांच्या बरोबरच नाट्यक्षेत्रातील कलाकार,पडद्या मागील तंत्रज्ञ उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ.नीलमताई गो-हे यांनी “कोरोनाच्या काळाने सर्वच क्षेत्रांत नुकसान केले आहे.मात्र सध्या सामाजिक अंतर पाळणे,सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कलाकार होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा कलाप्रेमी आहेत. मात्र कोरोनाचे संकट पुन्हा येवू नये यासाठी शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.मी नाट्य गृहांना पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी सुरक्षा,स्वच्छता गृहे,दुरूस्ती संबधी निर्देश दिले आहेत त्याचे पालन व्हावे असे संगितले आहे”. लीला गांधी म्हणल्या असा कोरोना महामारी काळ पुन्हा न येवो ही नटराज चरणी प्रार्थना. सुनील महाजन म्हणाले शासन म्हणून नव्हे तर गो-हे या नाट्य रसिक आहेत म्हणून व त्यांनी कलाकारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडले म्हणून त्यांच्या हस्ते नटराज पूजन केले आहे. रामचंद्र देखणे म्हणाले नाट्य हा पंचम वेद आहे.आज पासून याचा घोष पुन्हा सुरू होत आहे. पेढे वाटून सर्वांचे तोंड या प्रसंगी गोड करण्यात आले.
छायाचित्र : नटराज पूजन करताना नीलमताई गो-हे,सुनील महाजन,लीला गांधी व अन्य मान्यवर